मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व  दांडिया’ उत्सव  उत्साहात साजरा
तळेगाव स्टेशन:
मामासाहेब खांडगे स्कूलच्या प्रांगणात भोंडला व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दांडिया उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. इ. १ ली ते १० वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दुर्गापूजनाने व भोंडल्याने झाली.
सर्व विद्यार्थ्यांनी भोंडल्याच्या गाण्यावर पारंपरिक पद्धतीने फेर धरला होता. सौ. प्रगती काळे यांनी कोजागिरी चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान केल्या होत्या.
त्यानंतर विध्यार्थ्यानी समूहाने दांडिया व गरबा नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी ‘उत्कृष्ट वेशभूषा, व उत्कृष्ट दांडिया’ सादरीकरण अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे परीक्षण नृत्य दिग्दर्शक श्री. गगन सिंग यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री शिरसाठ यांनी केले.
     कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!