हिंजवडी:
एस.एन.आर्टस अ‍ॅण्ड ज्वेलरी रेन्टल बुटीकच्या दुस-या दालनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार व प्रवचनकार जयश्रीताई अक्षय येवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फोटोग्राफर्स,मेकअप आर्टिस्ट यांच्यासह या व्यवसायाशी निगडित मान्यवर उपस्थित होते. बाबूराव बुचडे व संजय बुचडे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला. मारूंजी शहर,हिंजवडी आयटी पार्क जवळ प्री वेडिंग,पास्ट वेडिंग,लग्नासाठी पारंपरिक ड्रेस,दागिने या आर्टस ज्वेलरी च्या दालनात उपलब्ध असणार आहे.
शितल निलेश घोटकुले यांनी या व्यवसायाची उभारणी केली असून आज दुस-या शाखेचे उद्घाटन झाले. लवकरच तिस-या शाखेचे उद्घाटन करणार असल्याचे घोटकुले यांनी सांगितले.
प्रवचनकार जयश्रीताई अक्षय महाराज येवले म्हणाल्या,” आज सर्वच क्षेत्रात महिला यशस्वी होत असताना दिसत आहे. ही बाब आपणांस भूषणावह आहे.कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत संसाराचा रहाटगाडा हाकताना अडचणी वाढल्या आहे. यावर मात करण्यासाठी महिला मंडळींनी सुरू केलेल्या लहान मोठ्या व्यवसायाला आता सुगीचे दिवस येत आहे.

error: Content is protected !!