महाबळेश्वर -भिलार येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे २९ ऑक्टोबरला पहिले राज्यस्तरीय अधिवेशन
राज्यस्तरीय अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर राहणार उपस्थित
सातारा:
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर भिलार येथे होणार असून या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे  पालकमंत्री शंभूराजे देसाई तर कार्याध्यक्षपदी माजी राज्यपाल सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील असणार आहे.
राज्याचे उच्च तंत्र व शिक्षण मंत्री व वस्त्रोदयोग मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख  पाहुणे  म्हणून उपस्थित राहणार आहे .या अधिवेशनासाठी राज्यभरातून  संपादक पत्रकारांची उपस्थिती राहणार आहेत.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी म्हणून सातारा जिल्हा संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांची बैठक सातारा येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली या अधिवेशनाच्या दरम्यान .महाराष्ट्रातून येणाऱ्या संपादक पत्रकारांचे स्वागत व इतर नियोजनाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!