मेकअप, सौंदर्य क्षेत्रात महिलांना ओळख निर्माण करण्याची संधी
पिंपरी :
ब्युटी पार्लर क्षेत्रातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत सखी मंच आणि रेडियंट क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मेकअप आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत मेकअप आणि ब्युटी पार्लर क्षेत्रातील महिलांना आपली ओळख व आपले काम सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मिळणार असल्याची माहिती रेडीयंट चे डायरेक्टर डाॅ.विकेश मुथा व  अंजना मुथा यांनी दिली.
स्पर्धेत सहभागी होणाया इच्छुकांनी लोकमत कार्यालय, विशाल टॉकीज, पिंपरी येथे स्वतः उपस्थित राहून नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे मुथा म्हणाले.
स्पर्धेत सहभाग घेण्याची आणि नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत आहे.
सखी मंच सभासदांसाठी मेकअप आणि सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी शुल्क ५०० रुपये इतके आहे व इतर महिलांसाठी १००० रुपये नोंदणी शुल्क असणार आहे. स्पर्धेत विजेत्यास तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे.
रेडीयंट च्या डायरेक्टर अंजना मुथा म्हणाले,”
मेकअप स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी मेकअप आर्टिस्ट त्यांनी स्वतःची मॉडेल व मेकअप सामग्री घेऊन येणे अनिवार्य आहे.
स्पर्धकांना कुठल्याही प्रकारच्या कॉस्ट्यूम किंवा ज्वेलरी पुरवली जाणार नाही.
सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांसाठी ९ ऑक्टोबरला ४ वाजता मोरया स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट, लिंक रोड, चिंचवड पुणे येथे प्रशिक्षण दिले जाईल.
वेळ : सोमवार (दि. १०)
सकाळी- ११ वाजता
स्थळ-रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड
अधिक माहितीसाठी-
संपर्क : ९८५०३०४०४६

error: Content is protected !!