मावळमित्र न्यूज विशेष:
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती. आपल्या देशाची ओळख कृषी प्रधान म्हणून आहे. अर्थव्यवस्थेचा पाया शेतीने रचला आहे,असे म्हटले तरी वावगे ठरू नये. शेती व्यवसायात होणा-या पिके ज्याला आपण सोनेरी धनाची उपमा देतो.या उत्पन्नाच्या आधारावर देशातील सजीव सृष्टी चा उदरनिर्वाह चालवत आहोत.आणि या शेती व्यवसायात मशागत करण्यासाठी वेळोवेळी काबाडकष्ट करुन काम करण्यासाठी मदत होते, ती आपल्या ‌शेतकऱ्यांच्या सर्जाराजा ची.खरं सांगायचं म्हटलं तर आपणास अतिशयोक्ती वाटेल कि ,आपल्या मुक्या जनावरांना हा शेतकरी लाडक्या लेकरांप्रमाणे जीव लावतो.
असंच एक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कान्हे मधील सातकर कुटुंब मुळातच शेती व्यवसायाचा तीन पिढ्या चां वारसा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.कारण सन १८१९ ते सन २०२२* एकत्र कुटुंब पद्धती या कुटुंबांतील प्रगतशील शेतकरी श्री.नारायराव सातकर आणि यांचे भाऊ,व ३मुलगे भरत सातकर,संतोष सातकर , अकुंश सातकर,सुना नातवंडे व पतवंडे असा हा परिवार.
या परिवारात मनुष्याला ज्या प्रमाणे जपलं पाहिजे त्या प्रमाणे मुक्या जनावरांना जीव लावून सांभाळ केला जातो..शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय आहे.हा व्यवसाय हा दुधाळ गावरान गाई, संकरित मु-हा,जाफर,दिल्ली,मैह्स या पासुन होणारं दुधाचे उत्पादन हे ह्या कुटुंबांच वैशिष्ट्य गेली  खिलार प्रजातीचा पांढरा शुभ्र खोंड म्हणजे त्यांचा बैल. सल्लु या बैला विषयी कुटुंबाचा  स्नेह,प्रेम,आपुलकी प्रती जिव्हाळा गेली अनेक वर्षे आहे.
या कुटुंबातील घटक या नात्याने या कुटुंबात शेतातील मशागत करण्यासाठी मदत केली.व बैलगाडी शर्यत सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी प्रथम क्रमांक मिळविला व अनेक  ठिकाणी फायनल सम्राट म्हणून ओळक केली.व आपल्या मालकाचे नाव पुणे जिल्हा व मावळ तालुक्यात प्रसिद्ध गाडामालक, फायनल सम्राट,व सातकर ग्रुप चा द बाॅस (सल्लु)या बैलाच्या वाढदिवसानिमित्त , या अनुषंगाने मानवी कृतज्ञता या कृतज्ञतेने हेतूने
सल्लु  या  लाडक्या सर्जाराजाचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. सल्लु आपणांस वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अशा शुभेच्छा देणा-या सुरेख रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. या अभिष्टचिंतन सोहळ्यास गावातील लोकप्रतिनिधीं ,सामाजिक कार्यकर्ते,आप्तेष्ट मंडळी आणि भावकी उपस्थित होते. सल्लूचे अभिष्टचिंतन करताना त्याला जोपासणा-या कुटूबियांतील घटकांचे अभिनंदन करण्यात आले.
(शब्दांकन-श्री.प्रदिप शिवाजी मोहिते.
व्हा.चेअरमन कान्हे वि.का.सह.सो मावळ)

error: Content is protected !!