वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
नवलाखउंब्रे:
नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका शारदा भगवान शिंदे यांनी आपल्या वर्गातील ५० विद्यार्थ्यांना कॅमलचा कंपास बॉक्स भेट दिला. तर शाळेतील ४५० विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.निमित्त होते शिंदे मॅडम यांंच्या वाढदिवसाचे. वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या शाळेत पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार, आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.शिंदे मॅडम परिसरातील विविध कंपन्यांच्या माध्यमातून शाळेला व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवत असतात. त्यामुळे पालक व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक आहे.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम शेटे, पंचायत समिती मा.सदस्या ललिता कोतुळकर मा.उपसरपंच राजु पडवळ,शिक्षकनेते  प्राचार्य भगवान शिंदे, चंद्रकांत शिनगारे,रमेश शिंदे,रोहिदास पापळ सर्व शिक्षकवृंद समारंभास उपस्थित होते.
शिंदे बाई यांनी नवीन पायंडा सुरू केल्याने ग्रामस्थांनी कौतुक केले,ललिताताई कोतुळकर,राजु पडवळ, भगवान शिंदे, शांताराम शेटे यांनी मनोगत व्यक्त केली, सुत्रसंचलन सौ.निता गोगावले यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी नियोजन केले.

error: Content is protected !!