कान्हे:
श्री. छत्रपती शिवाजी विद्या मंदिर कान्हे शाळेच्या इयत्ता आठवी ब वर्गातील विद्यार्थ्यांनी कस्तुरी पोतदार हिने इरोड तामिळनाडू येथे झालेल्या  राष्ट्रीय सिलंबम सांघिक इव्हेंट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
सिलंबम खेळाबरोबरच महाराष्ट्रीयन युद्धकला मर्दानी खेळ या स्पर्धे मध्ये दाखविण्यात आल्या.सिलंबम हा खेळ दक्षिण भारतातील प्रमुख युद्धकला आहे, या खेळात काठीची लढत, तलवार, सुरल, कट्यार, असे विविध शस्त्र फिरवले, या स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले.
या निमित्त शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.  जेष्ठ अध्यापक राम कदमबांडे , शहाजी लाखे ,  सुमन जाधव , सोमनाथ ‌साळुंखे ,  सुप्रिया पुंडले ,  रियाज तांबोळी , लक्ष्मण सातकर यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!