तळेगाव स्टेशन:
हैप्पी सिटी सोसायटी, वराळे रोड, तळेगाव दाभाडे येथे पहिल्यांदाच नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले.26 सप्टेंबर 2022 रोजी श्री. जितेंद्र परदेशी आणि सौ. स्नेहा परदेशी यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
पुढील 10 दिवस सोसायटी मधील विविध कुटुंबाकडून देवीची आरती करून प्रसाद अर्पित करण्यात आला. या उत्सवाच्या माध्यमातून लहान मुले – मुली, महिला आणि पुरुष यांच्यासाठी मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फॅशन शो, नृत्य स्पर्धा, पाककला, क्राफ्ट स्पर्धा, होम मिनिस्टर असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांना सोसायटी मधील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन या सर्व स्पर्धा मोठया उत्साहात आणि आनंदात पार पाडले . सर्व महिलांनी मिळून भोंडला, कन्यापूजन आणि महिलांचा ओटी भरणे असे कार्यक्रम राबविले . या सर्व कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ दसऱ्याला मोठया थाटात पार पडला.
या नवरात्री उत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन ॲड. स्नेहाताई परदेशी यांच्या कडून करण्यात आले. कार्यक्रमांचे नियोजन ॲड. स्नेहा परदेशी, विमा सल्लागार  मनीषा यादव, रोशनी साळवी, पुजा साळवी, मोहिनी देडे, अर्चना बामणे, रोहिणी नाईकनवरे, मयुरी मुडपल्ली, आरोही मित्तल, सुरक्षा माळी, अश्विनी रांजणे इ.यांनी केले.
        नवरात्री उत्सवासाठी संपूर्ण सोसायटी मधील नागरिकांसाठी महाप्रसादाची सोय पुरुष वर्गाकडून करण्यात आली. श्री. जितेंद्र परदेशी, मयूर साळवी, संदीप गायकवाड, मनिष काळे, गुरु देडे, उल्पेश साळवी, निखिल ठाकुर, रोहिदास आढाव, परशुराम आढाव, अर्जुन पाटील, दीपक शिंदे, मंगेश ढकोळ, भिवा नाईकनवरे, सचिन मोने,विठ्ठल यादव इ. चे कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.
दसऱ्याच्या दिवशी मोठ्या भक्तिमय वातावरण देवीच्या मूर्तिचे विसर्जन करण्यात आले.

error: Content is protected !!