फळणे गावच्या हद्दीत पिकअप पलटी
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मध्ये काल रात्री बारा ते एकच्या सुमारास फळणे गावच्या हद्दीमध्ये पिकप गाडीला अपघात झाला.  स्थानिक नागरिक गोरख मालपोटे यांनी  दिलेल्या माहितीनुसार MH.14. FT. 0609 हि  पिकअप गाडी वडेश्वर वरून कान्हे फाट्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
फळणे गावच्या हद्दीमधील संजय बंडोबा मालपोटे यांच्या पोल्ट्रीच्या समोर  रस्त्यावरून समोरून येत असणाऱ्या दुसऱ्या चार चाकी गाडीला साईट देत असताना  अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने, व त्या ठिकाणी रस्त्याच्या खालील मोरीच्या दोन्ही बाजूला साईटचे सौरक्षण कठडे नसल्यामुळे गाडी रस्त्यावरून आठ ते दहा फूट खाली शेतामध्ये जाऊन पडली.
दरम्यान या गाडीमध्ये वाहक व चालक या दोघांव्यतिरिक्त दुसरे कोणी प्रवासी नव्हते. तसेच वाहक व चालक यांना किरकोळ दुखापत झाली आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टाकवे गावचे माजी उपसरपंच रोहिदास असवले म्हणाले..
सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ उपअभियंता विभाग यांना या आशयाचे अनेक वेळा निवेदन दिले आहे, तसेच प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्येविषयी जाणीव करून दिलेली आहे.  मात्र या शासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही लोकप्रतिनिधीचा धाक नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत आहे अशा  रस्त्याच्या अनेक समस्या आहेत.
यामध्ये संबंधित गाडीचे मालकाचे नुकसान झाले असून तसेच गाडी रस्त्यावरती काढण्यासाठी, व गॅरेजला नेऊन  दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च येणार आहे. हि  सर्व नुकसान भरपाई यांना कोण देणार असा प्रश्न देखील यावेळी बोलताना उप सरपंच रोहिदास असवले यांनी उपस्थित केला आहे.

error: Content is protected !!