मामासाहेब खांडगे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्व. लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
तळेगाव स्टेशन:
   मामासाहेब खांडगे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.  लाल बहादूर शास्त्री याच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
   कु. तनिष्का शिंदे ह्या विद्यार्थिनीने गांधीजी आणि कु. जान्हवी माजीरे हिने लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.  त्यानंतर कु. उत्कर्ष बधाले ह्या विद्यार्थ्याने गांधीजींचा भूमिकाभिनय साकारून गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह या त्रिसूत्रीचा प्रत्यक्ष जीवनात आपण वापर केला पाहिजे असे दाखविले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला लढा हा केवळ इतिहास नसून एक जीवन आहे. गांधीजींच्या विचारांमधून महिलांना सर्व क्षेत्रात समान संधीच्या वाटा निर्माण झाल्या. गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मांडले या मुक अभियानाने  विद्यार्थ्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
  कु. मयांक साहू याने शास्त्री यांचा भूमिकाभिनय सादर केला. व ‘जय जवान,जय किसान’ च्या घोषणा दिल्या. कु. राजवीर पाटुळे याने स्वच्छतेचे महत्व स्पष्ट करणारी प्रतिज्ञा सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भाग्यश्री कपाळे हिने केले. संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आला.
         कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!