टाकवे बुद्रुक:
उकसान पठार वरील आखाडे वस्ती येथील नागरिकांची नवीन ट्रान्सफॉर्मर द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदर मावळ व नाणे मावळच्या मध्यावर असलेले उकसान पठारावरील आखाडे वस्ती येथे नवीन ट्रांसफार्मर मिळण्यासाठी नागरिकांची मागणी आहे.
दीनदयाळ उपाध्याय योजना अंतर्गत संपूर्ण पठारावर वीज पुरवठाचे काम झाले आहे. परिणामी  वीज पुरवठा संपूर्ण पठारावर सुरळीतपणे सुरु आहे. उकसान पठार शेडगे वस्ती क्र. २ वर  ट्रांसफार्मर बसविला आहे. त्यावरून उकसान पठार क्र. १ आखाडे वस्तीला सिंगल फेज विज पुरवठा केला जात आहे. या दोन्ही वस्त्यांमध्ये ३ ते ४ किलोमीटरचे अंतर आहे त्यामुळे तो विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.
परिणामी  याबाबत कर्मचाऱ्यांना तक्रार केल्यास दुरुस्ती करण्यासाठी दुर्गम भाग म्हणून जाणून बुजून दुर्लक्ष करतात विज पुरवठा सुरळीत होत नाही सुद्धा  तरीही  लाईट बिल  येत आहे विजेचा वापर मिळत नसल्यामुळे  प्रत्येक महिन्यात वीज बिल येत आहे
वीजपुरवा वारंवार खंडित होत असल्याने येथील वस्तीतील नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, घरामध्ये अंधार असल्यामुळे साप विंचू इत्यादी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण करता येत नाही घरा भोवती अंधार असल्यामुळे  वन्यप्राणी वस्तीतील जनावरे , कुत्री यांच्या वर हल्ला करीत आहेत यामुळे संपूर्ण वस्तीत भितीचे वातावरण पसरलेले आहे. येथील नागरीकांना अशा प्रकारच्या  समस्यांना तोंड द्यावं लागत आहे
या बाबत अधिकाऱ्यांनी उकसान पठार वरील आखाडे वस्तीला स्वतंत्र ट्रांसफार्मर बसवण्याची सोय करावी त्यामुळे संपूर्ण वस्ती वरील नागरिकांना दिलासा मिळेल.विज पुरवठा सुळीतपणे चालू करून द्यावा अशी मागणी येथील नागरीक करत आहे.
येथील स्थानिक नागरिक दत्ता आखाडे, मंगेश आखाडे, बाळु आखाडे, रामभाऊ आखाडे, कोंडीबा आखाडे, वसंत सुपे, खंडू हेमाडे, विध्यार्थी – किरण आखाडे, दत्ता ढवळे  ज्ञानेश्वर ढवळे, अंगणवाडी सेविका कालाबाई आखाडे
यांनी बोलताना खंत व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!