
धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेचा नफा ६४ लाख
तळेगाव दाभाडे:
धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली .दीपप्रज्वलान करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्यांचे स्वागत अमर खळदे यांनी केले .
लेखापरीक्षण अहवाल विनोद टकले यांनी वाचला सभेचे अध्यक्ष विजय शेटे यांनी आपल्या मनोगत मध्ये पतसंस्था कशी प्रगतीपथावर आहे. प्रगती पथावर असताना २३ वर्ष पतसंस्थेने ऑडिट वर्ग अ जपला असे सांगितले.
विजय शेटे म्हणाले,” सभासद हा पतसंस्थेचा मालक असताना आम्हालाही कारवाई करताना फार दुःख झाले अशी भावना व्यक्त केली. सर्व सभासदांना लाभांश हा ९% घोषित करून पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले यांनी पतसंस्थेचे उद्दिष्ट हे गरजू लोकांना कष्टकरी लोकांना व्यापारी बनवणे व उद्योजक बनवणे हेच आहे,असे सांगितले.
पतसंस्थेचे खजिनदार संतोष परदेशी यांनी आभार व्यक्त करताना सर्व ठेवीदार कर्जदार सभासद कर्मचारी वर्ग दैनंदिन प्रतिनिधी यांचे आभार मानले.
पतसंस्थेवर ठेवा व ठेवताल असा विश्वास व्यक्त केला दत्ताशेठ शिंदे दत्ताशेठ पिंजन शंकरराव शिंदे संजय शिंदे कैलास चव्हाण केशव कुल काशिनाथ निंबळे पोपटराव भेगडे मनोहर पगारे दत्तात्रय साळुंखे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतककर्मचारी सर्व दैनंदिन प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



