गोल्डन ग्लेडस च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कामशेत:
नाणे मावळातील करंजगावातील गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालयातील सन २००८-०९ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा साजरा झाला.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापक बापूराव नवले,दत्तात्रय महाजन,अनिल सातकर,दीपक गालफाडे,विजय केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गाडे,श्रीहरी कुटे,रेणुका गायकवाड व आभार विनायक नेवाळे यांनी मानले.

error: Content is protected !!