
गहुंजे:
काम केले म्हणून श्रेय घेण्यासाठी आलो नाही गावचे गावपण जपा आणि गावचा विकास साधा हे आवाहन करायला मी आलोय असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले. कुलदेवतेच्या साक्षीने सांगतो गहुंजेची पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून घेतली.क्षणीक आनंदासाठी गावाला कीड लावून देऊ नका,असे सूतोवाच करताना गावपण जपा, मतभेद विसरून विकास साधा असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून ४ कोटी ३६ लाख रूपये विकासनिधीतून सूरू करण्यात येणा-या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे गहुंजे भूमीपूजन करण्यात आले,यावेळी झालेल्या जाहीर सभेत शेळके बोलत होते. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनचे भूमीपूजन झाले.
शेळके म्हणाले,” भुमिपुजनाच्या निमित्ताने मी आपल्याशी मी सुसंवाद साधायला आलो. गावचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य व सरपंच करायला हवी. गावचा विकास व्हावा या साठी करातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. गहुंजे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील अनेक किस्से सांगताना हश्शा पिकला. विकासाची कामे दर्जेदार करून घ्या,असे आवाहनही शेळके यांनी केले.
छत्रपती शिवाजीमहाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,दिवंगत नेते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे आमदार शेळके यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. गहुंजे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शेळके यांचा बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. तसेच ढोल लेझीम च्या गजर करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे संचालक माऊली दाभाडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष राक्षे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,सारीका शेळके,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष दिपाली गराडे, सरपंच कुलदीप बोडके,,पुणे महानगर समितीच्या सदस्या दिपाली हुलावळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,देहूरोड शहराचे अध्यक्ष प्रविण झेंडे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे,माजी दतात्रय पडवळ,ज्येष्ठ नेते नारायण ठाकर, नितीन मु-हे,सुनिल दाभाडे, सचिन मु-हे ,उपस्थित होते.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” शहराचा विकास साधताना खेडे दुर्लक्षित होता कामा नये. माता भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरणार आहे ही आनंदाची बाब आहे.त्यांचे कष्ट कमी होईल आणि वेळही वाचेल असे खांडगे म्हणाले. राष्ट्रवादी चा आमदार आल्यावर तालुक्यात कोट्यवधी रूपयांचा विकास निधी उपलब्ध झाला असून विकास काम होत असल्याचा झंझावात आपण पाहतो.
गहुंजे प्राईम लोकेशन आहे,पुणे मुंबई शहराला जोडणारे हे महत्वाचे ठिकाण आहे. मावळातील जनतेने सावध असलेच पाहिजे. सर्वसामान्य जनतेला विकासाची अपेक्षा आहे. वेदांत-फॉक्सकॉन गेल्याने तालुक्याचे मोठे नुकसान झाले.
ग्रामस्थ संभाजी बोडके,मधुकर बोडके,गुलाबराव बोडके,हिरामण बोडके,उत्तम बोडके,मच्छिंद्र बोडके,गोरक्षनाथ बोडके,संजय बोडके, शितल बोडके, मंदाकिनी बोडके, हर्षदा बोडके,पुजा बोडके,भामाबाई बोडके,वंदना तरस, यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गहुंजे गावाचा पूल, चौराई देवी मंदिरासाठी निधी,छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मंदिराच्या उभारणीसाठी पावणे तीन लाख रुपये,रस्ते, वीज,पाणी साठी निधी मिळतोय याचे समाधान. गावात येजा करण्यासाठी बस येत जाते याचे आम्हाला समाधान असल्याचे उत्तमराव बोडके यांनी प्रास्ताविकात सागितले. ज्येष्ठ नेते मंगलप्रभात लोढा यांनी गावासाठी एक रूपयाचा निधी दिला नसल्याचे उत्तम बोडके यांनी सांगितली.निर्गुणराव बोडके यांनी सुत्रसंचालन केले .नितीन बोडके व शितल बोडके यांनी आभार मानले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



