सक्षम युवती ही काळाची गरज
पिंपरी:
“सक्षम युवती ही काळाची गरज आहे! नवरात्रोत्सवाचा आनंद घेत असताना प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थिनींना पाठबळ देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे!” असे विचार लायन्स क्लब प्रांतपाल राजेश कोठावदे यांनी व्यक्त केले.
मावळ परिसरातील वहानगाव येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या दहा विद्यार्थिनींना लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२, रिजन ३ च्या वतीने सायकली प्रदान करण्यात आल्या. समन्वयक रिजन चेअरपर्सन अनिल झोपे, राज मुच्छाल, बी. एल. जोशी, सुनील चेकर, मनोज भळगट, भूषण महाजन, रवी सातपुते, श्रेयस दीक्षित, विजय सारडा, दिलीपसिह मोहिते, नीरा आनंद, सुकेतू शहा,सरपंच नामदेव शेलार, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस  रामदास वाडेकर उपस्थित होते.
बोरिवली आणि कांबरे या आंदर मावळ भागातील दुर्गम गावातून पायपीट करीत या विद्यार्थिनी शाळेत येतात. घरची परिस्थिती आर्थिक हलाखीची असल्याने सायकल घेणेदेखील त्यांना परवडत नाही. लायन्स क्लबच्या माध्यमातून नव्या सायकली मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
  सरपंच नामदेव शेलार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी एकशे आठ पणत्या प्रज्वलित करून श्री दुर्गादेवीची सामुदायिक आरती करण्यात आली. त्यानंतर लायन्स क्लब ३२३४ डी-२ मधील पिंपरी चिंचवड, मावळ, पुणे सिटी, चाकण परिसर यामधील सुमारे साठ क्लबच्या सदस्यांच्या कुटुंबीयांनी गरबा नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. संयोजक अंशुल शर्मा यांनी स्वागत केले. संयोजक शैलेश आपटे, राजेंद्र काळे, शैलजा सांगळे, यांच्यासह विविध छत्तीस क्लबच्या सदस्यांनी संयोजनात सहकार्य केले. कार्यक्रमाचे संयोजक जॉनी थडानी, नीलेश पाटील आणि अक्षता कान्हुरकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल झोपे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!