स्व.ॲड. शंकरराव दामोदर भोंडे त‍ालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
मोठ्या गटात झारा हुजेफा तर लहान गटात सागर चौधरी  प्रथम
लोणावळा:
विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट संचलित ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा आयोजित स्व. ॲड. शंकरराव दामोदर भोंडे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्य‍ उत्साहात पार पडली भोंडे हायस्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या वर्षापासून या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .मोठ्या गटात झारा हुजेफा तर लहान गटात सागर चौधरी यांनी  प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्रासह चषक देण्यात आले.
तालुक्यातील १५ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या. ही स्पर्धा ५वी ते ७वी व ८ वी ते ९वी अशा दोन गटात घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्याच्या अंगी असलेली कौशल्य विकसित व्हावीत हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी सांगितले तर अरविंद कुलकर्णी यांनी स्वर्गीय शंकरराव भोंडेंच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या कार्याचा गौरव केला. संजय विद्वांस, अरविंद कुलकर्णी, सुनिल यादव, बी.जी.माने, संजीव वीर, आनंद नाईक यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले संस्थेचे अध्यक्ष  ॲड. माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे, दिलिप भोंडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल साळवे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका माधवी थत्ते यांच्यासह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाग्यश्री पाटील व रिना वानखेडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नुतन घाणेकर यांनी आभार मानले
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
१) गट१ इ.५वी ते ७वी
प्रथम क्रमांक- सागर राधारमण चौधरी (गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूल लोणावळा)
द्वितिय क्रमांक – शर्वरी संजीव पायघन (सरस्वती विद्यामंदीर तळेगाव)
तृतीय क्रमांक – आदित्य अमित दळवी ( ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा)
उत्तेजनार्थ शौर्या दामोदर गदादे व इशान दिपक तारे
२)गट २ (इ.८वी ते १०वी)
प्रथम क्रमांक – झारा हुजेफा (  ॲड.  बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा)
द्वितीय क्रमांक –  स्मृति मारूती आंबेकर ( परिज्ञानाश्रम विद्यालय कार्ला)
तृतीय क्रमांक – हर्षदा रोहिदास गरूड (गुरुकुल हायस्कुल लोणावळा)
उत्तेजनार्थ – आयुष धनेश त्रिपाठी (जैन इंग्लीश स्कूल तळेगाव) व  जान्हवी श्रावण महाजन(प्रगती विद्या मंदीर तळेगाव)

error: Content is protected !!