कामशेत : कामशेत शहरापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर ताजे गाव आहे.येथील ताजुबाई देवीचे मंदिर हे प्राचीन असून कार्ला येथील एकविरा देवीची लहान बहीण म्हणून देखील उल्लेख केला जातो.
दरवर्षी हनुमान जयंती,पौर्णिमाला एकविरा देवीचा उत्सव असतो तेंव्हा ताजुबाई देवीची पायी पालखी घेऊन गावकरी मोठी बहिणीला म्हणजेच कार्ला येथील एकविरा देवीला भेटण्यासाठी ताजुबाईची पालखी जात असते.
ताजुबाई देवीचे मंदिर हे विसापूर किल्ल्याच्या समोरील राम टेकडी ( भातरास ) च्या पायथ्याशी व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असून दरवर्षी नवरात्री मध्ये गावातील ग्रामस्थ येथे जाऊन दगडी दिवे लावण्याची परंपरा अखंड नऊ दिवस लावून त्याची देखरेख केली जाते.
या देवीच्या पूर्वेकडील बाजूस जानुबाई देवी असून पश्चिमेच्या बाजूला विसापूर लोहगड किल्ले तर दक्षिणेच्या बाजूला बेडसे लेणी उत्तरेच्या बाजूस मोठी बहीण आई एकविरा देवी अशी पर्यटक स्थळ आहेत.
ताजुबाई देवीच्या मंदिरातील पुजारी गबळू गुरव व नंदू केदारी हे पूजा करत असून जागरण म्हणून भजन व देवीची गाणी गायली जातात. संध्याकाळी ६ वाजता देवीची महाआरतीच्या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात.गावातील ग्रामस्थ कडून मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा केला जातो.

error: Content is protected !!