बाळा भेगडे यांची भाजपा लोकसभा प्रवास योजनेच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी निवड
तळेगाव दाभाडे:
माजी राज्यमंत्री  बाळा भेगडे यांची भाजपा लोकसभा प्रवास योजनेच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी निवड  करण्यात आली. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे.
भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपा लोकसभा प्रवास योजनेचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून काम पहात होते. त्यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने या पदासाठी भेगडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही निवड जाहिर झाली आहे.
बाळा भेगडे हे मावळ विधानसभेचे दोन वेळा आमदार राहिले असून काही काळ राज्यमंत्री होते. त्यांनी यापुर्वी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष पद, महाराष्ट्र प्रदेशावरील पक्षाची विविध पदे व जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते.
  त्यांच्यावर पक्षाने ही मोठी  जबाबदारी टाकल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्यावर दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलवू असा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!