तळेगाव स्टेशन:
१३  व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत मामासाहेब खांडगे स्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले.
पुणे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशन आयोजित १३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चॅम्पिअनशिप स्पर्धेत मामासाहेब खांडगे स्कूलच्या विद्यार्थिनींनी अंतिम फेरीत द्वितीय स्थान पटकावले. त्याचबरोबर १४ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांचा व १७ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांचा अशा दोन्ही गटांनी उपांत्य फेरीत मजल मारली. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व मेहनत घेऊन हे यश संपादन केले. या स्पर्धा महाराष्ट्र मंडळ स्वारगेट पुणे, इथे दिनांक २४ व २५ सप्टेंबर या दिवशी पार पडल्या.
एकूण ३४ संघ या स्पर्धेमध्ये सामील झाले होते. पुणे ग्रामीण मधून खेळून मुलींच्या संघाने ‘पुणे सिटी’ च्या संघाला मात देत हे यश संपादन केले. विद्यार्थिनींनीच्या संघाने करंडक व प्रशस्तिपत्रक पटकावले. या संघामध्ये कु. सृष्टी ढमढेरे (कर्णधार) कु. संचिता गवई, कु. श्रुती नायर कु.सिद्धी भरगुडे,कु. सृष्टी पडवळ, कु.वैदेही कुलट, कु.केतकी जाधव,कु.राधिका पडवळ , कु. मयुरी बवरे यांचा समावेश होता.      
यासाठी शाळेचे शारीरिक शिक्षणाचे सर श्री. युनूस पटेल सरानी मार्गदर्शन केले. याचबरोबर शाळेतील इ. ६ वी अ च्या कु. वैष्णवी शर्मा ह्या विद्यार्थिनीने कलापिनी (तळेगाव दाभाडे ) आयोजित सुगम संगीत स्पर्धेत किशोरवयीन गटात प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे  शाळेचे चेअरमन मा.श्री गणेश खांडगे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व भावी आयुष्यात सुद्धा अशीच कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक ,पालक यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!