राजगुरुनगर:
खेड तालुक्याचे औद्यिगिक व नागरीकरण विचारात घेता नागरीकांना गतिमान प्रशासन लाभण्यासाठी तालुक्याचे विभाजन करून पश्चिम भागातील गावाचां मिळुन नविन भिमाशंकर तालुका निर्माण करण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक जनतेने केली आहे.या आशयाचा ठराव करून राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली.
पोटापाण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक नागरिक मुंबई शहरात वास्तव्य करीत आहे. डबेवाले देखील याच परिसरातील आहे. तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणाचा प्रशासकीय कामावर परिणाम होतोय. प्रशासकीय काम अधिक गतिमान करण्यासाठी नव्या भीमाशंकर तालुका करावा अशी भावना जनतेतून व्यक्त होत असल्याचा दावा तळेकर यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तळेकर म्हणाले,”
पश्चिम पट्या मधिल शंभर महसुली गावांचा मिळून भिमाशंकर हा नविन तालुका निर्माण करणे प्रशासकीय दृष्ट्या आणि येथील जनतेच्या सोई नुसार गरजेचे आहे. कारण येथील गावातील जनतेला तालुक्यातील कचेरीत कामासाठी जायचे म्हणटले की पन्नास किमोमिटर जा आणि पन्नास किलोमिटर या असा प्रवास करावा लागतो आहे.
ही जनता खेड येथे कामासाठी गेली की तेखील व्यवस्था कोलमडून पडते त्या फटका स्थानिकां सह जनतेला बसतो. खेड शहरातील   काही समस्या कायम आहेत. त्या काही कमी होत नाहीत. दोन दिवसा पुर्वी सहा महीन्याच्या बाळाचा बेशिस्त वहातुकी मुळे बळी गेला. तेव्हा या वर कामय स्वरूपी मार्र्ग काढण्यासाठी खेड तालुक्याचे विभाजन करून नविन भिमाशंकर तालुका निर्माण करणे गरजेचे आहे. त्या मुळे खेड येथील गर्दी कमी होईल.
या नविन तालुक्याचे मुख्यालय “कुडे” सारख्या मध्यवर्ती गावात केले पाहीजे पश्चिम पट्यातील कुडे हे गाव असे आहे जे पश्चिम पट्यातील सर्व गावांना रस्त्याने थेट जोडले गेले आहे. काही नविन जिल्हे व तालुके निर्माण करण्याचे महाराष्ट्र सरकारच्या विचाराधिन आहे
या निमित्ताने महाराष्ट्र सरकार कडे येथिल स्थानिक जनता मागणी करत आहे की खेड तालुक्याचे विभाजन करून पश्चिम भागाचा “ भिमाशंकर” हा नविन तालुका निर्माण करावा.
या मागणीला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी या भागातील ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, नोंदणीकृत मंडळे यांनी या संदर्भातला ठराव पास करून तहसीलदार,जिल्हाधिकारी, यांचे कडे पाठवावा अशी वनंती आहे.
बहुतांश डबेवाल्यांची गावे याच भागात आहेत त्यांना ही नविन तालुका निर्माण होणे सोईचे आहे या बाबतचा ठराव “मुंबई डबेवाला असोशिएशन” पारीत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकरच पाठवणार आहे.
तळेकर म्हणाले, खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत .पुर्व पट्टा व  पश्चिम पट्टा .पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणि अविकसित असा राहीला आहे.

error: Content is protected !!