
वडगाव मावळ:
खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे या भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी दिला.
पंचायत समिती मावळ व मावळ विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शेळके बोलत होते.
प्राथमिक शिक्षक ५०, माध्यमिक विभाग २४, विशेष पुरस्कार-०६ प्रशासनातील अधिकारी- १५ व तालुक्यातील उपक्रमशील शाळा २४ असे १२० पुरस्कार देऊन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गुरुजनांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद होते. शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी अधिकारी बाळासाहेब राक्षे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती ज्योती शिंदे, निकीता घोटकुले, सुवर्णा कुंभार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदु धनवे, दिपक हुलावळे विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
शेळके म्हणाले,” जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खरी गुणवत्ता असते .त्यांना त्यांच्या पातळीवर जाऊन शिक्षक शिक्षण देतात. परंतु अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा नसल्याने खाजगी शाळांच्या तुलनेत ते कमी पडतात त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद म्हणाले ,” आजच्या समारंभात अनेक शिक्षकांना गुणवंत पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्कारामुळे प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्याचा उपयोग करावा व आपले काम अधिक उत्तम कसे होईल यासाठी प्रयत्न करावे.
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड म्हणाल्या,”विद्यार्थी घडवणारा एकमेव स्त्रोत हा शिक्षक असून कोरोना काळात झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान जलदगतीने भरुन काढुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



