वडगाव मावळ:
भारताच्या  स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान अनन्यसाधारण आहे .अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी जल ,जंगल आणि जमिनीच्या पारंपारिक हक्कासाठी आपलं सर्वस्व बलिदान दिले.विशेषतः ब्रिटिशांनी जंगलविषयक जे अमानुष कायदे केले होते.
त्यामुळे आदिवासींच्या मूलभूत अधिकारांवर  गदा येणार होती त्याला विरोध म्हणून चिरणेरच्या जंगलात आदिवासींनी मोठा सत्याग्रह  केला होता. हा सत्याग्रह दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी सत्याग्रहींवर गोळीबार केला होता.या गोळीबारात क्रांतिवीर नाग्या कातकरी यांना हुतात्म्य प्राप्त झाले होते.त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मावळ तालुका आदिवासी बिरसा ब्रिगेड च्या वतीने बेलज या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिलम ताई होत्या.
यावेळी आदिवासी शिवलिंग तरूण मंडळ बेलज यांनी ढोल ताशांच्या गजरात प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर अंकुश मोरमारे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,  प्रमुख मार्गदर्शक कविता ताई मोरमारे यांनी नाग्या कातकरी याच योगदान आणि कार्य आपल्या मनोगतात  मांडले.तसेच सुरेश चिमटे सर यांनी मोलाचे मार्ग दर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात हिलम ताईंनी कातकरी समाजाने शिक्षण घेतले पाहिजे,हिम्मत दाखवुन अन्यायाविरोधात उभे राहिले पाहिजे असे सांगितले. यावेळी गावातील आदिवासी बांधव तसेच बिरसा ब्रिगेड मावळ चे कार्यकर्ते उपस्थिती होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी बिरसा ब्रिगेड मावळ  चे उपध्यक्ष मारुती वाजे यांनी  मोलाचे योगदान दिले.
यावेळी राष्ट्रवादी आदिवासी सेलचे अध्यक्ष किरण नाना हेमाडे, बिरसा ब्रिगेड सचिव गणेश मोरमारे,मंगेश लांघी, शिवाजी कशाळे,मारुती चिमटे,सोमनाथ मोरमारे,अजय बुरुड, राजू हिलम ,मयुर चिमटे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.   मंगेश लांघी यांनी आभार मानले,कातकरी बांधवांनी सर्वांसाठी चहा नाष्टाची सोय केेली होती.

error: Content is protected !!