वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत आधारकार्ड अभियान राबविण्यात येणार आहे.
लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी मुलांचे/मुलींचे मुळ जन्मदाखला (Birth Certificate Original) व सोबत येणान्या (फक्त आई किंवा वडील) यांचे आधार कार्ड आणावे तसेच मुल आणि पालक स्वत: हजर हवेत अशी माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिली.
मोबाईल नंबर अपडेटसाठी आधारकार्ड व माणुस स्वत: हजर पाहिजे. नावांध्ये बदल करण्यासाठी आधार कार्ड व authorised marriage certificate government gazzete copy सोबत लागणार आहे.
पत्ता बदलण्यासाठी rent agreement, Index, लाईटबील (फक्त पत्नीसाठी) बँकेचे फोटो असलेले पासबुक, आधारकार्डची आवश्यकता आहे. आधारकार्डसाठी स्वतः आले पाहिजे व सर्व कागदपत्रे Original पाहिजेत.
नवीन आधार नोंदणीसाठी कागदपत्रे आणावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आधार कार्ड दुरुस्ती पूर्णपणे फ्री असणार आहे.
ओळखपत्र पुरावा साठी  (फक्त १) पॅन कार्ड, मतदान कार्ड, लहान मुलांसाठी बोनाफाईट, जन्म दाखला लागणार आहे. तर  पत्याचा पुरावा  साठी (फक्त १) रेशन कार्ड, लाईट बिल, बँक पासबुक, रजिस्टर भाडेकरार असला तरी चालेल असे सुचविण्यात आले आहे.
३९९ रू मध्ये १० लाख रूपयांचा अपघात विमा  वडगाव कातवी गावातील नागरिकांसाठी काढण्याची सुविधा ही करण्यात आली आहे. या अपघाती विमा संरक्षणात
अपघाती मृत्यु – ९० लाख, कायमचे अपंगत्व – १० लाख रूपये, दवाखाना खर्च – ६० हजार रूपये, मुलांचा शिक्षण खर्च – १ लाख रूपयापर्यंत प्रती प्रती मुल (जास्तीत जास्त २ मुलाना संपुर्ण शिक्षण पुर्ण होईपर्यंत), अडमिट असेपर्यंत दररोज १००० रूपये (१० दिवस) , खर्च ३०००० रूपये, अपघाताने पॅरालीसीस झाल्यास १० लाख रूपये , कुंटुबाला दवाखाना प्रवासखर्च २५००० रूपये असे लाभ मिळणार आहे.
विमा वयोमर्यादा १८ ते ६५ वर्षे पर्यत च्या नागरिकांना घेता येणार आहे.
सोमवार दि. २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२२ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
आधिक महितीसाठी :
.८३२९८७८७२२ / ९८२२८३८८२३ / ९८८१२८५९३९ संपर्क साधावा किंवा
नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे जनसंपर्क कार्यालय, राजमुद्रा ‘मार्ट शेजारी, वडगाव मावळ या कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन नगराध्यक्ष  मयूर प्रकाशराव ढोरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!