मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील ओबीसी सेल मध्ये काम करत असलेल्या पदाधिकारी यांच्या पुढे येत असलेल्या ओबीसी सेल मधील समस्या व त्यावर उपाययोजना करण्यासाठी वडगाव मावळ येथील शासकिय विश्रामगृह येथे मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके व तालुकाध्यक्ष गणेशजी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली, या बैठक प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान नगरसेवक श्री.चंद्रजित वाघमारे, मावळ तालुका सरचिटणीस श्री.रामदास वाडेकर, देहू शहराध्यक्ष श्री.विकास कंद यांनी ओबीसी सेल संघटनेत चालू असलेले काम तसेच पदाधिकारी यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना या संदर्भात मार्गदर्शन केले.
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २७% आरक्षण आहे! मा. छगन भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नामुळे व तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. शरद पवार  साहेब यांचेमुळे देशात पहिल्यांदा मंडल आयोग महाराष्ट्रात २४ एप्रिल १९९४ ला लागु झाला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधे ओबीसींना २७% आरक्षण लागु झाले, याचा फायदा ओबीसींना होवुन महाराष्ट्रात ओबीसींची सुमारे ६८ हजार पदे आरक्षित झालीत! अनेक जिल्हा परीषद अध्यक्ष, नगरपालिका व महानगरपालीकांचे महापौर हे ओबीसींचे याच आरक्षणामधुन झालेले आहे!
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण वैध ठरवले.
महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले. यावेळी सर्व ओबीसी बांधवानी या निर्णयाचे स्वागत केले.
ओबीसी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ता याला अनेक महत्वाच्या पदावर पक्षात काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली.
राष्ट्रवादी व ओबीसी पदाधिकारी यांचे नाते कशा पद्धतीने अजून घट्ट होईल, ओबीसी समाजातील दाखले, शैक्षणिक फी सवलती, रोजगार निर्मिती, महिला बचत गट, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी ना संधी अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
  यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मंगेश खैरे, मावळ ओबीसी सेल महिला तालुकाध्यक्ष सौ. संध्या थोरात, मावळ वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, कार्याध्यक्ष तुकाराम ठोसर, कार्याध्यक्ष सचिन साळुंखे (कुंभार), प्रमोद शिंदे, बाळासाहेब ठीकडे, राजू दळवी, प्रशांत सुतार, गणेश सुतार, महेश गाडे, प्रमोद कदम, मयुर गुरव, स्वप्नील  मावळकर, विकास चौधरी, उमेश तंबोरे, विनय लवांगरे, अक्षय बेल्हेकर, गणेश झरेकर, जयश्री पवार, प्रगती पाटील, वनमाला दळवी, रेखा बरिदे, मनीषा जाडकर, वैशाली लगाडे, अर्चना भोकरे, गंगा तळेकर, नीलिमा शिंदे, लीना दिघे, प्रणिता पिंपरीकर, लक्ष्मी गजाकोश, प्रीती नारायण, नंदा ठाकूर, सुधा भालेकर, नलिनी गायकवाड, अनिता देशमुख, शिल्पा चौधरी, संगीता भोरपकर, अनिता शिंदे, संगीता पटेकर, अनिशा बनसोडे, मीना शिंदे,  अभिजित सुतार, राहील तांबोळी, स्वप्निल पावसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!