वडगाव मावळ-
    नवरात्र उत्सवानिमित्त   येथील मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन सोमवार दि. २६ सप्टेंबर ते मंगळवार दि. ४ ऑक्टोबर  पर्यंत दररोज  सायकांळी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ रविंद्र आचार्य व व्याख्यान मालेचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी पत्रकार परीषदेत दिली
      येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात दररोज सायंकाळी ६.३० वा  व्याख्यान होणार  आहे
  सोमवार दि. २६रोजी    राष्टवादी कॉग्रेस चे प्रदेशाध्यक्ष  जयवंतराव पाटील यांचे ( राजकारण आणि सामाजिक बांधिलकी )यावर  व्याख्यान होणार असुन अध्यक्ष पदी मावळचे खासदार श्रीरंग बारणे तर प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार सुनिल शेळके असणार आहे
    मंगळवार दि. २७, रोजी प्रसिद्ध  सिने  अभिनेते शशांक शेंडे  ( माझा अभिनयाचा प्रवास )यावर व्याख्यान होणार असुन अध्यक्ष पदी माजी मंत्री बाळा भेगडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ असणार आहे
  
    बुधवार दि. २८  रोजी लेखिका निलीमाताई देशपांडे यांचे  ( खरंच सुपर वुमन होण्याची गरज आहे का?) यावर व्याख्यान होणार असुन अध्यक्ष पदी वडगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षा सपनाताई  छाजेड तर प्रमुख पाहुणे म्हणुन मावळ भाजपा महीला मोर्चाच्या अध्यक्षा .
सायलीताई बोत्रे असणार आहे
      गुरुवार दि. २९ रोजी संत वाडमय लेखिका धनश्रीताई लेले  यांचे (संत नामदेवांची अमृत वाणी) यावर व्याख्यान होणार असुन अध्यक्ष पदी माजी आमदार मा. मेधाताई कुलकर्णी  तर प्रमुख पाहुणे म्हणुन   राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई  चाकणकर असणार आहे
   शुक्रवार दि ३० रोजी  संस्थापक चाणक्य मंडळ अविनाशजी धर्माधिकारी यांचे ( देशाची शतकपूर्तीकडे वाटचाल) या विषयावर व्याख्यान होणार असुन अध्यक्ष पदी उद्योजक  रामदासजी काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन लेखिका डॉ चित्रलेखा पुरदंरे असणार आहे
    शनिवार दि १ आँक्टोबर रोजी सांगोल्याचे  आमदार शहाजीबापु पाटील  यांचे (,सामान्य माणसाचं असामान्य नेतृत्व) यावर व्याख्यान होणार असुन अध्यक्ष पदी
माजी आमदार मा. दिगंबर भेगडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नेते  शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संभाजीतात्या थोरात असणार आहे
    रविवार दि. २ रोजी साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य शेखर गायकवाड यांचे (,प्रॉपर्टी आणि माणूस,)या विषयावर व्याख्यान होणार असुन अध्यक्ष पदी मा. उपजिल्हाधिकारी सतिश  राऊत  तर प्रमुख पाहुणे म्हणुन उद्योजक  रामदासजी जैद असणार आहे
     सोमवार दि. ३ रोजी मा. संदिपजी पाठक सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते , जागतिक किर्तीचे एकपात्री नाटक (वन्हाड निघालय लंडनला.) होणार असुन अध्यक्ष पदी आखिल  भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तर प्रमुख पाहुणे म्हणुन  उद्योजक अशोक  काळोखे असणार आहे
   मंगळवार दि. ४ रोजी कवि मा. अनंतजी राऊत, मा. प्रशांतजी केंदळे  यांची( काव्य धारा) कार्यक्रम  होणार असुन अध्यक्ष पदी , प. महा. आर.पी.आयचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे तर म .सा.प. भोसरी पुणे अध्यक्ष मुरलीधर साठे हे असणार आहे
   बुधवार दि. ५ रोजी सायं. ५.०० वा. विजयादशमी व हिंदू विजयदिना निमित्त भारतमाता प्रतिमेची भव्य मिरवणुक श्री. खंडोबा मंदिरपासुन सुरू होईल.लकी ड्रॉ व्दारे दररोज एका भाग्यवान श्रोत्यास हिरा गोल्ड, बाजारपेठ, वडगांव मावळ यांजकडून चांदीचे नाणे सप्रेम भेट देण्यात येईल  दररोज सायं. ७ पुर्वी येणाऱ्या पहिल्या ५० भाग्यवान श्रोत्यांना लकी ड्रॉ कुपनचे वाटप होईल.

error: Content is protected !!