तहसिल कार्यालय वतीने राष्ट्रनेता ते “राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ” कामशेत मधील महासेवा कार्यक्रमास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
कामशेत:
शासन निर्देशानुसार १७ सप्टेंबर २०२२ राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस  ते २ ऑक्टोबर २०२२ राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पर्यंत  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा हा कार्यक्रम आज दि.२३ रोजी कामशेत मधे श्री गणेश मंगल कार्यालय या ठिकाण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमांत उत्पन्नाचा दाखला ,जातीचा दाखला घेण्यासाठी – ४९ नागरिकांनी लाभ घेतला असुन , नवीन शिधापत्रिका दुबार पत्रिका साठी – ९८ , मतदार नवीन नोंदणी, दुरुस्ती ,मयताचे नाव कमी करणे – ९३, आधार कार्ड काढणे , दुरुस्ती – ४६, संजय निराधार योजना, श्रावण बाळ, योजना इंदिरा गांधी योजना -३, कृषी विषयक सेवा माहिती -२३, मंडळ अधिकारी यांनी अहवाल,फेरफार निर्गत,तक्रार केस निर्गत -७ ,तलाठी कार्यालय यांनी , उत्पन्नाचा दाखला ,सातबारा देणे – ६९ असे एकुण ३९० , नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजावून घेत तात्काळ सोडवल्या.
   कार्यक्रमांमध्ये नागरिकांना तात्काळ रेशन कार्ड, उत्पन्न दाखला मिळत असल्याने  नागरिकांनी आनंद व्यक्त केला.कार्यक्रमास तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,किरण राक्षे ,मच्छिंद्र केदारी,सामाजिक कार्यकर्ते दत्ता काजळे,अभिमन्यू शिंदे,प्रवीण शिंदे,आदी स्थानिक पदाधिकारी यांनी कार्यक्रमास भेटी दिल्या.
   सदर कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार संतोष सोनवणे साहेब,मंडल अधिकारी सुरेश जगताप साहेब ,अव्वल का.मुकुंद खोमने साहेब,अव्वल का.अशा धायगुडे मॅडम,तलाठी योगेश वाघ,गणेश पोतदार,रवि मोरुद,किरण जगताप,रमेश कोल्हे,प्रसाद भाडाळे आदी तलाठी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!