कामशेत:
नवरात्रोत्सव उत्सवानिमित्त कामशेत बाजारपेठ  येथील श्री. महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
अश्विन शु. प्रतिपदा शके १९४४, सोमवार, दि. २६/०९/२०२२ ते आश्विन शु. १० विजयादशमी बुधवार, दि. ०५/१०/२०२२ पर्यत हा सोहळा संपन्न होणार आहे.
सोमवार दि. २६/०२/२०१२ सकाळी ९ वा. गणेश पुजन सकाळी १० वा. श्री महालक्ष्मी मुर्ती स्थापने निमित्त महापूजा हस्ते सकाळी ११ वा. श्री महालक्ष्मी देवीचा अभिषेक . ७ वा. श्री महालक्ष्मी देवीची भव्य मिरवणूक उद्धघाटन सायं. ६ वा. श्री महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना ४ मार्च ८.३५. श्री महालक्ष्मी देवीची आरती रात्री ९:३० वा. वामन गोंधळी आणि पार्टी इचलकरंजी यांचा गोंधळाचा कार्यक्रम होईल.
अखंड हरिनाम सप्ताहात  पहाटे ४ ते ६ वा. – काकडा आरती सकाळी ७ ते ९ वा. नियमाचे भजन सकाळी १० ते १ वा. गाथा भजन सायं. ४ ते ५ वा. प्रवचन सायं. ५ ते ६ वा. हरीपाठ  सायं. ६ ते ८ वा. हरीकीर्तन रात्री ८.१५ वा. श्री महालक्ष्मी देवीची आरती रात्री ८.३० वा. महाप्रसाद  रात्री ९:३० वा. हरीजागर  असे धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
या सप्ताहात अनुक्रमे
ह.भ.प. मोनिका मांडेकर फाटक (आँढोली मावळ),ह.भ.प. काजल भेगडे (चिंचोली, देहू),ह.भ.प. संगिता येणपुरे चोपडे ( येलघोल),ह.भ.प. रुपाली नाणेकर (कार्ला, मावळ),ह.भ.प. सिद्धी लष्करी (टाकवे, मावळ),ह.भ.प. ज्ञानेश्वरी कल्हाटकर (कल्हाट, मावळ),ह.भ.प. वैष्णवीताई कडू (पवनानगर ) यांची प्रवचने होतील.
ह.भ प. माधव महाराज घोटेकर (नाशिक),ह.भ.प. अॅड. शंकर महाराज शेवाळे(पुणे),ह.भ.प. कबीर महाराज आत्तार (खेड शिवापुर),ह.भ.प. मुथा पारस महाराज (अ.नगर),ह.भ.प. सुधाकर महाराज बाघ (पैठण),ह.भ.प.महंत अमृताश्रम महाराज जोशी(बीड),ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे (वारजे माळवाडी, पुणे) यांची कीर्तने होतील.
विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ, खडकाळा,संगीत विशारद गुरुवर्य अरुणमहाराज येवले गुरुजी व शिष्य परिवार
ओमकार संगीत भजन कामशेत,ह.भ.प. सुखलाल महाराज बुचडे आणि मंडळी ,भैरवनाथ भजनी मंडळ कुसगाव खुर्द,पांडुरंग भजनी मंडळ कोळवण,डोणआई भजनी मंडळ, डोणे यांचे हरिजागर होणार आहे.
मंगळवार दि. ०४/१०/२०१२ रोजी नगरप्रदक्षिणा असून सकाळी ८ वा. व सकाळी १० ते १२ वा. ह.भ.प. गणेश महाराज कारले (वाकडेवाडी) यांचे काल्याचे कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ, बाजारपेठ कामशेत, ता. मावळ, जि. पुणे आयोजक असून  कीर्तन साथ मावळ तालुका दिंडी समाज करणार आहे.

error: Content is protected !!