वडगाव मावळ:
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे
यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यात ‘जन आक्रोश आंदोलन” करण्यात येणार आहे.
वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाठविल्यामुळे, महाराष्ट्रातील युवा पिढीच्या झालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार  आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता वडगाव मावळ पंचायत  समिती कार्यालया समोर हे ‘जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
शिवसेनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, उद्योगमंत्री सुभाष देसाई व  आदित्य  ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव पुणे येथे होण्याचे जवळपास निश्चित झाले होते.
   मात्र, सत्ताबदल झाल्यानंतर, सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला पाठवला गेला. यामुळे महाराष्ट्रातील १ लाख तरूण बेरोजगार झाले. १ ५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राने गमावली.
आता बेरोजगार झालेल्या तरूण तरूणींना करायचे काय ? तरुणाईच्या हक्काचा – रोजगार हे खोके सरकार कसा उपल्बध करून देणार? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आणि हा प्रकल्प परराज्यात गेल्याच्या निषेधार्थ हे ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!