डबेवाला रोटी बॅन्कचे नवीन वाहन कार्यरत
मुंबई:
दक्षिण मुंबईत कार्यरत असलेली डबेवाला रोटी बॅक  यांना योग्य ते स्वरूप देण्यासाठी काही डबेवाल्यांनी “ डबेवाला रोटी फाउंडेशन” या नविन संस्थेची नुकतीच स्थापना केली व त्यांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात केली.
या संस्थेच्या माध्यमातुन काही डबेवाले शिल्लक राहीलेले जेवण सायकल वर जमा करून भुकेलेल्यांना वाटत होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता “बॅाम्बे रोटरी क्लब बेव्युह”च्या अध्यक्षा जंखना मेहता यांनी पुढाकार घेऊन “ श्रीराम सेवा संकल्प फाऊंडेशन “ चे सी.एस.आर. प्रमुख बाला मुरगन यांचे कडून डबेवाला रोटी बॅन्क व कपडा बॅन्क यांचे साठी एक “ईको व्हॅन” उपलब्द करून दिली.
श्रीराम सेवा संकल्प फाउंडेशन चे सी. एस. आर. प्रमुख बाला मुरगन यांचे हस्ते डबेवाला रोटी फाऊंडेशन चे अघ्यक्ष कैलास शिंदे यांचे कडे गाडीची चावी सुपुर्द करण्यात आली. यावेळी “ बॅाम्बे रोटरी क्लब बेव्हुयच्या”अध्यक्षा जंखना मेहता व मुंबंई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते.
कैलास शिंदे अध्यक्ष डबेवाला रोटी फाऊंडेशन म्हणाले,”
आम्ही  शिल्लक राहीलेले जेवण सायकलच्या माध्यमातुन गरीबांना वाटत होतो ,आता या गाडीचा माध्यमातुन जेवण वाटू या मुळे अधीक लोकांना जेवण वाटू शकतो. आम्ही आमचे डबे पोहचवण्याचे काम तर करूच पण साधारणता दुपारी २ वाजे पर्यंत दक्षिण मुंबईती डबेवाल्यांचे काम संपते त्या मुळे दुापारी २ ते सायं ६ वाजे पर्यंत रोटी बन्केचे काम केले जाईल.
अधिक माहितीसाठी-मो. 8424996803

error: Content is protected !!