तळेगाव दाभाडे : साई येथील युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली जयवंत पिंगळे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कामगार सेलचे मावळ तालुका अध्यक्ष मंगेश राणे तसेच कार्याध्यक्ष विजय निंबळे यांनी ही निवड जाहीर केली.
राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर,मावळ तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस मारूती वाळूंज,सरचिटणीस रामदास वाडेकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर पिंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले ,त्यावेळी सर्व कामगार सेल चे शहर आणि विभाग अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते .
ज्ञानेश्वर उर्फ माऊली पिंगळे यांनी या पूर्वी तळेगाव शहर राष्ट्रवादी कामगार सेल सोशल मिडियाचे प्रमुख पदी काम केले आहे.
नवनिर्वाचित मावळ तालुका कामगार सेल संपर्क प्रमुख माऊली पिंगळे म्हणाले,” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार,संघटनेचे काम आणि आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून स्थानिक बेरोजगार कामगारांचे प्रश्न सोडविण्यास सदैव प्रयत्नशील राहणार.

error: Content is protected !!