टाकवे बुद्रुक:
माळेगाव खुर्द येथील युवा कार्यकर्ते सोपान नथू गोंटे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया आदिवासी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी आदिवासी सेलचे मावळ तालुका अध्यक्ष किरण हेमाडे यांनी ही निवड जाहीर केली.
राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर,माजी सरपंच दतात्रय पडवळ,मावळ तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस रामदास वाडेकर यांच्या हस्ते गोंटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.गोंटे यांनी या पूर्वी आंदर मावळ राष्ट्रवादी आदिवासी सेल सोशल मिडियाचे अध्यक्ष पदी काम केले आहे. तसेच ते बिरसा ब्रिगेड संघटनेत सक्रीय आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष सोपान गोंटे म्हणाले,” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार,संघटनेचे काम आणि आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून होणा-या विकासात्मक कामांचा सोशल मीडियावरून जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करणार.

error: Content is protected !!