रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे सॅनिटरी नॅपकिन्से वाटप
कामशेत:           
श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कान्हे फाटा, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा कामशेत,श्री एकविरा विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज कार्ला या तीनही शाळांमध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.
तसेच आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले भविष्यकाळात होणारे संसर्ग रोखण्यासाठी कशा पद्धतीने हे नॅपकिन वापरावे याविषयी माहितीही देण्यात आली.* *रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे पॅडमॅन रो.राजू कडलग हे गेली सात वर्ष क्लबच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या प्रोजेक्टसाठी सॅनिटरी नॅपकिन स्वखर्चाने उपलब्ध करून देतात त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष रो. दीपक फल्ले यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
व रोटरी क्लब तर्फे घेण्यात येणाऱ्या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या तर मुलींनी नीसंकोच पणे आपल्या शंका विचाराव्यात याकरिता प्रोत्साहन दिले.रो.भगवान शिंदे यांनी रोटरी क्लब तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली तर रो.रेश्मा फडतरे यांनी सॅनिटरी नॅपकिनच्या वापरा संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.तीनही शाळांमधील शेकडो मुलींनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.
सर्व शाळांमधील प्राचार्य व शिक्षक वर्गाच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. प्रत्येक शाळेत पाचशे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप याप्रसंगी करण्यात* *आले.रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे, प्रेसिडेंट इलेक्ट रो.शाहीन शेख,प्रकल्प प्रमुख अँस्न शालिनी कडलग,रो.राजू कडलक,रो.संजय मेहता, रो.प्रशांत ताये,रो.तानाजी मराठे,रो.हर्षल पंडित, आधी पदाधिकाऱ्यांसह सर्व शाळांमधील प्राचार्य शिक्षक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

error: Content is protected !!