लोणावळा शहर पोलीसांनी शालेय भागात भरारी पथक नेमुन गस्ती घालावी – अभिमन्यू शिंदे
लोणावळा :
लोणावळा शहरातीत व्ही.पी.एस.विद्यालय येथे दोन दिवसा पुर्वी शालेय आवारात मुलांची हाणामारी चा प्रकार घडला होता. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून अशा प्रकारामुळे शाळेचे नाव बदनाम होत आहे.
व्हि.पी.एस.विद्यालय ही संस्था आतिशय नामांकित असुन या शाळेतुन दर्जेदार शिक्षण प्रणाली मुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थी  डॉक्टर ,इंजिनियर इ.व प्रतिष्ठित नागरिक घडवले आहेत.
सदर , गैर प्रकारामुळे शाळेचे होणारी अवहेलना थांबावी, पुन्हा अशा घटना घडू नयेत या करिता लोणावळा शहर पोलीस स्टेशन खात्यामार्फत शालेय , भागात भरारी पथक नेमून गस्ती घालावी अशी मागणीचे निवेदन आज दि.१९ रोजी  लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांना मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी ,लोणावळा युवा मोर्चा वतीने देण्यात आले .
या वेळी , मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, लोणावळा शहर युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे,विद्यार्थी आघाडी अ.मा.अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, लोणावळा युवा मोर्चा कार्याध्यक्ष शुभम दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!