तळेगाव दाभाडे:
श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ 2022 मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या वर्षातील गणेशोत्सवातील स्थिर देखावाचे परीक्षण कार्यकर्त्यांची मेहनत पाहून केली गेले .हलत्या देखाव्यानचे परीक्षण मुर्तची संख्या व आवाजावर  हालचाल पाहून केले गेले .सजीव (जिवंत) देखावा याचे परीक्षण देहबोली वर केले गेले.
कार्यक्रमात स्थिर देखावा, सजीव देखावा व हलता देखावा तसेच आदर्श गणेशोत्सव मंडळ इत्यादी पारितोषिके देण्यात आली.आदर्श गणेशोत्सव मंडळ 2022 पुरस्कार जय बजरंग तरुण मंडळ ट्रस्ट राजेंद्र चौक या मंडळाला देण्यात आला.
स्थिर देखावा 
प्रथम क्रमांक- अखिल विवेकानंद मित्र मंडळ ( केदारनाथ मंदिर प्रतिकृती) द्वितीय क्रमांक विशाल मित्र मंडळ(घोरवाडेश्वर महादेव मंदिर) हलता देखावा :-
प्रथम क्रमांक -फ्रेंड्स क्लब मित्र मंडळ (शिवरायांची न्यायनीती) द्वितीय क्रमांक -श्रीमंत मुरलीधर मंडळ (मार्कंडे याची शिवभक्ती) तृतीय क्रमांक- जय बजरंग तरुण मंडळ जिजामाता चौक (रक्तबीज राक्षसाचा वध )
सजीव देखावा
प्रथम क्रमांक- शिवप्रेमी मित्र मंडळ (उरी सर्जिकल स्ट्राइक) द्वितीय क्रमांक विभागून सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश तरुण मंडळ (शेर शिवराज) तसेच हिंदूराज तरुण मंडळ(बलसागर भारत होवो) तृतीय क्रमांक विभागून
शिवक्रांती मित्र मंडळ (श्री तिरुपती बालाजी जन्मकथा) व तरुण ऐक्य मित्र मंडळ (अत्याचाराला कठोर शासन) या देखाव्यांनी पारितोषिक पटकवली.
कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पठारे तसेच युवा उद्योजक  संकेत खळदे उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रशांत दिवेकर,श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक खंडूजी टकले, विद्यमान अध्यक्ष अमर खळदे ,संचालक संजय शिंदे, धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय शेटे, संचालक संजय शिंदे, प्रतिष्ठानचे संचालक श्री सतीश गरुड ,श्री सदाशिव भोसले ,कु संग्राम शिंदे ,आदित्य टकले सागर लगड, श्री संदीप गडसिंग, प्रथमेश शेटे उपस्थित होते.
या मंडळाच्या देखाव्यांना पारितोषिके देण्यात आली.
प्रास्ताविक श्री संजय शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री पठारे यांनी गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर आपले मत व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रशांत दिवेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव यातील बदललेले स्वरूप व कार्यकर्त्यांची मानसिकता यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमर खळदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विविध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन  मयूर पिंगळे यांनी केले आभार प्रदर्शन सिद्धनाथ नलावडे यांनी मानले .

error: Content is protected !!