मंगरूळ:
येथील पिरसाईबाबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी  शिवाजी प्रभाकर शिंदे व  लहू विठ्ठल भसे यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन रुपेश विठ्ठल घोजगे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत या दोन्हीं निवड बिनविरोध करण्यात आल्या .
या वेळी व्हा चेअरमन  शिवराम शिंदे , संचालक  मुरलीधर पवार ,  कैलास पवार ,  नामदेव पवार , वरसु चव्हाण , राजाराम भसे तसेच संस्थेचे सचिव मदनराव आडिवळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष रूपेश घोजगे म्हणाले,” शेतक-यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सेवा संस्थेने आजपर्यत अनेक कुटूंब उभी केली आहे. विशेषत: फळबाग, पाॅलीहाऊस साठी कर्ज पुरवठा केला आहे. संस्थेच्या सभासदांनी नियमित कर्जाची परतफेड करून आपली पत वाढवावी.

error: Content is protected !!