पंतप्रघान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त डबेवाल्यांचे “स्वच्छ भारत अभियान”
मुंबई:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई डबेवाला असोशिएशन  “ स्वच्छ भारत अभियान “ राबविणार आहे.या अभियानात शाळा, कॅालेज, मधील विद्यार्थींना स्वच्छते चा संदेश देणार तसेच विविध ठिकाणी “स्वच्छ भारत अभियानाचे” प्रात्यक्षिके केली जातील.
भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबेवाल्यांना  स्वच्छ भारत अभियानाचे दुत नियुक्त केले आहे.  तसेच डबेवाल्यांनी या मोहीमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. डबेवाल्यांनी हे निमंत्रण नुसते आनंदाने स्वीकारलेच नाही, तर आपली सामाजिक नैतिकता समजून लगेच कामाला सुरवातही केली. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत भाषण चालूच होते की, मुंबईत डबेवाल्यांनी लोअर परेल स्टेशन परीसरात,  साफसफाई मोहीमेला सुरवात देखील केली.
ही तत्परता का?
जर देशाचे पंतप्रधान एका आशेपोटी आपल्यावर “विश्वास” दाखवत असतील, तर आपणही त्यांच्या विश्वासाला खरं उतरायलाच हवं. शेवटी आपण ज्या प्रांतातून आलो तो शिवरायांचा मावळ प्रांत, मग आपल्याला दिलेली जबाबदारी, तेव्हढ्याच विश्वासाने पार नको का पाडायला ? ज्या विश्वासाने त्यांनी आपल्याला स्वच्छेतेचे दुत नेमले असेल, तर त्यांच्या त्या विश्वासाला कुठेही तडा जायला नको, म्हणूनच डबेवाल्यांनीही कंबर कसली आणि या स्वच्छता मोहिमेत स्वत:ला झोकून दिलं.
मुंबई डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”“स्वच्छ भारत अभियान” यात आम्ही प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम तर राबवली पण त्याचबरोबर या अभियानाचा “संदेश” लोकांपर्यत पोहचवला होता. तसेच लोकांनाही या अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन  आम्ही करत होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबेवाल्यांना “ स्वच्छ भारत अभियानाचे” दुत नियुक्त केले त्या नंतर आम्ही स्वच्छ ते बाबत अनेक मोहीमा हाती घेतल्या या मोहीमात काही अंशी यशस्वी झालो आहोत याचा अभिमान वाटत असला, तरी अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
आम्ही स्वत: स्वच्छ भारत अभियानात सहभागी तर झालोच व इतरांनीही या अभियानात सहभागी व्हावं त्यासाठी लोकांचं मनपरिवर्तन देखील करत राहिलो. स्वच्छ भारत अभियान हा जगन्नाथाचा रथ आहे आणि हा रथ १३५ कोटी भारतीयांनी एकत्रितपणे ओढायचा आहे. यासाठी आम्ही सतत लोकांना आवाहन करत असतो.
‘भोजना आधी हात स्वच्छ धुणे’ किती आवश्यक आहे? हे ही आम्ही लोकांना समजावून सांगितले आहे. कारण बहुतांश आजार हे अस्वच्छ हाताने भोजन केल्यानेच होतात. मग भोजना आधी हात स्वच्छ धुतले पाहीजे असा संदेश आम्ही जनते पर्यंत पोचवला आहे.
करोनाच्या पार्श्वभुमीवर स्वच्छ भारत अभियानाला खुपच महत्व आले होते. आपण जर आपला परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण केला तर कोरोनाला आपण नक्कीच थोपवू शकतो.
तळेकर पुढे म्हणाले,” आज संपूर्ण देशात “स्वच्छ भारत अभियान” ही चळवळ जोर धरत आहे. या चळवळीला यश नक्की मिळेल, पण त्यासाठी काही वर्ष जावी लागतील. कदाचीत एखादे दशकही लागेल. पुढील ५ ते १० वर्षभरात भारत हा नक्कीच एक स्वच्छ देश म्हणून दुनियेला पहायला मिळेल.
स्वच्छ भारत अभियान आम्ही आमच्या पध्दतीने राबवले. पण यात आम्ही समाधानी नाही, पंतप्रघान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा ऐकदा आम्ही हे अभियान अधिक जोमाने राबवू व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवू.

error: Content is protected !!