वडेश्वर:
वडेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञसंचालक पदी मुकुंद भाऊराव खांडभोर यांची व  सुरेश सखाराम वाघमारे यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष  शांताराम सुदाम लष्करी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत या दोन्ही निवड बिनविरोध  करण्यात आल्या..
या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन  मारुती नामदेव शिंदे, संचालक  राजू धोंडिबा खांडभोर ,नारायण बाबुराव ठाकर, बबन लक्ष्मण हेमाडे , मधुकर दादू तुपके , तानाजी खंडू शिंदे,महादू कान्हू कशाळे ,शंकर खंडू पांडे सौ. कुसुम तुकाराम लष्करी  सौ आशा मारुती खांडभोर उपस्थित होते.माजी ग्रामपंचायत सदस्य छगन लष्करी, माजी सरपंच तुकाराम लष्करी यांनी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव उमेश मारुती वाडेकर यांनी संस्थेच्या दप्तरी नोंद करून पुढील निवडीबाबत कामकाज केले.

error: Content is protected !!