
वडगाव मावळ :
वडगाव मावळ सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले असल्याने भाजप मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात आज गुरुवार (दि. १५) रोजी झालेल्या भाजपा, शिवसेना आरपीआय (A) महायुतीच्या टाळाठोक आंदोलनास यश आले आहे.
यावेळी आंदोलकांना उपनिबंधक बाळासाहेब तावरे यांनी सुर्यवंशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याचे सांगून त्यांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई केली जाईल व उद्यापासून ते या कार्यालयात दिसणार नाहीत, असे आश्वासन दिल्याने आंदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी तालुक्यातील गृहनिर्माण संस्था, कृषी विकास संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर निर्णय घेतले असून या सर्व निर्णयांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची वारंवार मागणी करून देखील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने आज गुरुवार (दि. १५) रोजी भाजपा शिवसेना आर.पी.आय.(A) महायुतीच्या वतीने सहाय्यक निबंधक कार्यालयावर टाळाठोक आंदोलन करून या भ्रष्ट अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांकडून सुर्यवंशींनी केलेल्या बेकायदेशीर निर्णयाचा पाढा जनतेसमोर मांडून भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, रिपाई जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मा. सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी विठ्ठल सुर्यवंशी यांनी केलेल्या बेकायदेशीर निर्णयाचा पाढा जनतेसमोर मांडून त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड केला व अशा भ्रष्ट अधिकाऱ्यास पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, रिपाई तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, मा. उपसभापती शांताराम कदम, सरचिटणीस बाळासाहेब जाधव, शहराध्यक्ष अनंता कुडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, गणेश धानिवले, डॉ. बाळासाहेब पलांडे, शत्रुघ्न धनवे, ज्ञानेश्वर आडकर या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विठ्ठल सुर्यवंशी यांनी त्या-त्या गावातील सोसायटीमध्ये घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयाची माहिती जनतेसमोर मांडली व अशा भ्रष्ट मग्रूर अधिकाऱ्याचे निलंबन करून तालुक्यातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
यावेळी प्रभारी भास्करआप्पा म्हाळसकर, मा. सभापती निवृत्ती शेटे, रिपाई युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र खांडभोर, मावळ भाजपचे मा. अध्यक्ष प्रशांत ढोरे, मा. सभापती ज्योती शिंदे, मा. उपसभापती निकिता घोटकुले, मा. जिल्हा परिषद सदस्या अलका धानविले, जि. प. टाकवे नाणे गट अध्यक्ष रोहिदास असवले, पी.एम.आर.डी.सदस्य कुलदीप बोडके, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, विठ्ठल घारे, नामदेव भसे, सरचिटणीस सुनील चव्हाण, किरण राक्षे, मच्छिंद्र केदारी, गणेश ठाकर, अंकुश सोनवणे, मा. सरपंच नितीन कुडे, सचिन काजळे, सचिन येवले, मा. जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव, धनश्री भोंडवे, सीमा आहेर, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, मातंग समाज अध्यक्ष सचिन भांडे, शासकीय आघाडी अध्यक्ष रवि आंद्रे, सहकार आघाडी उपाध्यक्ष विनायक पोटफोडे, कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, विनायक भेगडे, विठ्ठल तुर्डे, संतोष असवले यांच्यासह वडगाव शहरातील सर्व पदाधिकारी नगरसेवक तथा मावळ तालुक्यातील भाजपा, शिवसेना, आर.पी.आय. (A) महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



