वडगाव मावळ:
सुजलाम सुफलाम राष्ट्र निर्मितीसाठी मावळकरांनी दिलेले योगदानाची शासनाला आठवण नाही का?असा प्रश्न मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी उपस्थित केला आहे.मावळ वासियांनी केलेल्या त्यागाची हीच परतफेड आहे का? मावळ करांच्या तोंडाला पाने पुसुन शासन काय साध्य करणार आहे?आमच्या स्वराज्यासाठी आमच्या रक्ताचे पाट वाहिले? स्वातंत्र्यासाठी बलिदानने झाली. स्वातंत्र्याच्या लढ्यात मावळचे योगदान महत्वपूर्ण राहिले. आणि स्वातंत्र्यानंतर घामाने समृद्ध केलेल्या जमीनी आम्ही राष्ट्रविकासासाठी राज्याला आणि देशाला दिल्या?आता कुठे सुखाचे दोन घास मिळतील.
हाताला काम मिळेल,रोजगार आणि व्यापार वाढले,आर्थिक उत्पन्नाचे मार्गे वाढतील असे संकेत मिळत असतानाच
वेदांता व तैवान येथील फॉक्सकॉन या कंपनीचा  सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण  करणारा प्रकल्प मावळातून पळवून गुजरातला घेऊन जाण्याचा घाट घातला जातो,याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी म्हणाले.
या प्रकल्पाला साठी एकुण १०० मुद्दांचा विचार करुन त्यांनी तळेगांव टप्पा क्रमांक ४ ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगांव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ॲटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, JNPT शी असणारी कनेक्टीव्हिटी. उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगांव येथील १००० एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरीष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगांव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे,असे असताना हा प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्याचा राज्य आणि केंद्र यांचा का मानस आहे?असा आक्षेप खांडगे यांनी घेतला.
हा प्रकल्प स्थानांतरीत करू नये यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी झालेल्या सभेत खांडगे यांनी मावळ करांनी राष्ट्र निर्मितीसाठी दिलेल्या त्यागाची शासन कर्त्त्याना आठवण दिली.या शिवाय तालुक्याच्या अस्मितेसाठी व विकासासाठी राजकीय जोडे बाजूला काढून सर्वानी एकत्रित पणे लढा दिला पाहिजे अशी कळकळीची विनंती केली.
खांडगे म्हणाले,”
राज्याच्या विकासात मावळ तालुक्याचे योगदान स्वातंत्र्यपूर्व काळा पासून अधोरेखित आहे. देशातील विजेची गरज ओळखून टाटा पॉवरने वीज निर्मितीसाठी उभारलेली ठोकळवाडी,शिरोता,सोमवडी,वलवण,भुशीचे धरण बांधणीसाठी शेतक-यांनी शेकडो एकर जमीन कवडीमोल भावाने शासनाच्या हवाली केल्या.
पिंपरी चिंचवडचे औद्योगिकरण, देहू आळंदी तीर्थस्थळा सह पिंपरी चिंचवड शहरासाठी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पवना,वाडिवळे,जाधववाडी,आंद्रा सह अन्य धरणे बांधली यासाठी ही शेतक-यांनी आपल्या शेत जमिनी दिल्या.
पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग, मुंबई पुणेअद्रुतगती महामार्ग,रेल्वे मार्ग,संरक्षण विभाग,डीओडी डेपो,सीआरपीएफ साठी झालेल्या संपादनात मावळ तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे.यासाठी शेतक-यांनी कवडीमोल दराने दिल्या.या साठी जमिनी संपादित झाल्या त्याचा परतावा देखील अजून प्रलंबित आहे. अनेक प्रश्नही तसेच रेंगाळत पडले आहे.आम्ही राष्ट्र निर्मितीसाठी  दिलेल्या योगदानाची शासनाला आठवण नाही का? असा प्रश्न विचाराची आम्हाला वेळ आली आहे .
कारण,मावळ तालुक्यातील प्रस्तावित असलेला वेदांता ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हस्तांतरित होत असल्याबाबत आमची खंत आहे.औद्योगिकीकरण वाढू लागले .इतका मोठा प्रकल्प आमच्या भागात होत असल्याने आमच्या शेतक-यांना आनंद झाला होता. या आनंदावर क्षणात विरजण पडले.
कुठेही तरी सुखाचे दिवस येतील अशी आस असताना आमच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप केले जात आहे. आम्ही केलेल्या त्यागाची हीच का आम्हाला पावती.या पूर्वी आम्ही दिले आहे. आता परत करण्याची वेळ तुमच्यावर असताना आमच्या ताटातील घास तुम्ही हिरावून घेत आहे  याचे दु:ख होत आहे,असेही खांडगे म्हणाले.
आणि तितकाच संताप देखील होत आहे, असे ठणकावून सांगताना,भरलेल्या पिकाच्या जमीनीवर देशाच्या संरक्षण खात्यासाठी  तुमच्या हवाली केल्या हे कदाचित तुम्हाला माहित नसेल तर माहिती करून घ्या. आमच्या त्यागाला मोजायला तुमच्या कडे  कोणाच तराजूचा काटा नसेल.
स्वराज्यासाठी आमचं रक्त साडलं,स्वातंत्र्यासाठी आम्ही बलिदान दिले आहे.स्वातंत्र्यानंतर शिवारात पिकणारी डोलणारी शेती तुमच्या हवाली केली.आज आम्ही आमच्या हाताला तुमच्या कडे काम मागतोय. ते ही तुम्ही हिरावून घेत आहात. हे वागणं ठीक नाही,असा निर्वाणीचा इशारा द्यायला खांडगे विसारले नाही.

error: Content is protected !!