वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष अविनाश बधाले यांनी पदवीधर सेलची कार्यकारणी आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत जाहीर केली.या कार्यकारणीतील पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
पदवीधर सेलचे अध्यक्ष अविनाश बधाले यांनी जाहीर केलेल्या व नियुक्तीपत्र दिलेल्या पदाधिकारी यांची नावे पुढील प्रमाणे.
या कार्यकारणीत अक्षय जाधव (उपाध्यक्ष),कल्पेश आंबेकर (उपाध्यक्ष ),कृष्णा भंडारी (सरचिटणीस),कैलास भोईर ( सचिव),गौरव शिंदे ( अंदर मावळ अध्यक्ष ),मयूर पारीठे ( अंदर मावळ उपाध्यक्ष ),विकास गायकवाड (नाने मावळ अध्यक्ष ),अमित ठाकर ( पवन मावळ अध्यक्ष ),सौरभ सावले ( वडगाव शहर अध्यक्ष),संदीप बहोत ( देहूरोड शहर अध्यक्ष )
आनंदा टिळेकर (देहू शहर अध्यक्ष),ऋषिकेश जाधव ( लोणावळा शहर अध्यक्ष ) यांची वर्णी लागली.यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे,राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर यांच्या सह पक्षाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्य भागातील व शहरातील पदवीधर असलेल्या कार्यकर्त्यांची पदवीधर सेल मध्ये समावेश करून पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष अविनाश बधाले यांनी सांगितले.

error: Content is protected !!