वडगाव मावळ:
मावळ तालुक्यामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे रस्ते  रस्त्यावरती भलेमोठे पडलेले खड्डे त्यामुळे अपघात होऊन विपरीत परिणाम होऊन,  तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपुऱ्या नियोजनामुळे  मागील महिन्यामध्ये  टाकवे बुद्रुक व बेलज येथील दोन जणांना हाकनाक जीव गमवावा लागला आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गट भाजपाचे अध्यक्ष रोहीदास असवले यांनी केली.
असवले यांनी या आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. या निवेदनात असवले म्हणाले,”
मागील महिन्यामध्ये  सुरू असलेल्या मुसळदार पावसामुळे माऊ येथे समोरून येणाऱ्या चार चाकी गाडीला  गाडीला साइड देताना दोन चाकी गाडी घसरून टाकवे बु. येथील  गौतम शंकर जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.
तर दुसऱ्या दिवशी टाकवे – कान्हे फाटा रस्त्यावर टाकवे गावच्या हद्दीत चॅम्पियन कंपनी समोर झाड उन्मळुन पडले होते.त्या दिवशी रात्रीच्या वेळी  केशव शंकर कोकाटे (वय ६१ रा. बेलज ता मावळ) हे त्यांची दुचाकी (क्र.  एम एच १४ ए आर १९३९ ) जात असताना त्या झाडाला धडकुन त्यांचा जागीच मृत्यु झाला.
सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ यांच्या अखत्यारित येणाऱ्या मावळ तालुक्या मधील रस्त्यांच्या बाजुची धोकादायक झाडे त्यांच्या फांद्या छाटण्यात याव्यात तसेच ज्या ठिकाणी साईट पट्ट्यांचा अभाव आहे तसेच रस्त्यामध्ये अनेक भले मोठाले खड्डे पडले आहेत हे सर्व सुव्यवस्थित करण्यात यावे अन्यथा मावळ तुलाका भाजपाच्या वतीने आपल्या कार्यालयावरती येत्या १५ दिवसात मोठया प्रमाणावरती मोर्चा काढला जाईल व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील..
असा इशारा जिल्हा परिषद टाकवे नाणे गट भाजपा अध्यक्ष
रोहीदास राघु असवले यांनी दिला आहे.
यावेळी  रोहिदास जांभुळकर, माजी चेअरमन  विकास असवले,  भाजपा टाकवे शहर अध्यक्ष दत्तात्रय असवले,  काळूराम घोजगे,  तुकाराम कोंद्रे,  काशिनाथ जांभूळकर, मुनावर आत्तर, विष्णू लोंढे  उपस्थित होते.

error: Content is protected !!