सोमाटणे:
येथील कै.श्री.सुदामराव दगडू मु-हे (पाटील) यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक ९/९/२२ रोजी(अनंत चतुर्दशी)ह.भ.प.स्वाध्वी वैष्णवी सरस्वती (रामायणाचार्य,भागवताचार्य) आळंदी यांची प्रवचन रुपी सेवा आयोजित केली होती.
  वडिलांच्या स्मरणार्थ राजेश सुदामराव मुऱ्हे (पाटील) (माजी आदर्श सरपंच ग्रा. पं.सोमाटणे ) यांनी श्री घोरवडेश्वर देवस्थानास एक्कावन हजार ची देणगी आणि शाळेच्या भव्य इमारती साठी एक लाख देणगी दिली.
  शाळेसाठी कायम मदत करणारे, आपल्या गावाचे हित जाणणारे, गावाच्या विकासासाठी कायम पुढे होऊन काम करणारे असे आमचे माजी विद्यार्थी राजेश सुदामराव मुऱ्हे (पाटील)यांनी आज एक समाजात नवीन आदर्श दाखवून दिला असल्याचे गौरवोद्गार  शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांनी व्यक्त केले.
  

error: Content is protected !!