पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठानच्या सभासदांनी गणेशोत्सवात पोलीस बंदोबस्तास मदत करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला.
चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्रीकृष्णदेव खराडे साहेब व पोलीस निरिक्षक  प्रकाश जाधव   वाहतूक विभागाचे अर्जून पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार प्रतिष्ठानचे ४० सभासद विशेष पोलीस अधिकारी म्हणून बंदोबस्ताला विविध ठिकाणी मदत करित होते.
तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभाग चिंचवड चे  अर्जुन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २७ सभासदांनी विशेष पोलीस अधिकारी म्हणुन जबाबदारी पार पाडली. याचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या सहकार्याने उपाध्यक्ष शब्बीर मुजावर पाहत होते.

error: Content is protected !!