बेबडओहोळ च्या उपसरपंचपदी कमल गराडे
वडगाव मावळ:
बेबडओहोळ/पिंपळखुटे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कमल रोहिदास गराडे यांची आज बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायतचे मावळत्या उपसरपंच लता गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज सरपंच सविता सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत  निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली, सहाय्यक म्हणून ग्रामसेवक यांनी काम पाहिले.
यावेळी उपसरपंच पदासाठी गराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सविता सप्रे यांनी जाहीर केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गराडे, संध्या शिंदे, नम्रता घारे, तुषार बारमुख, मनीषा घारे, संदीप घारे, सुधीर गायकवाड, कविता ढमाले, बाळू ठाकर उपस्थित होते.
निवडीनंतर जेष्ठ नेते अशोकराव घारे, राष्ट्रवादीचे वरीष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, संदीप घारे, सेवक घारे, गणेश विनोदे आदींच्या हस्ते गराडे यांचा सन्मान करण्यात आला. मधुकरराव घारे, बबनराव घारे, अशोकराव घारे, शहाजी घारे, सतीश ढमाले, गोपीचंद गराडे, नितीन मुर्हे, गोकुळ हिंगे, रविंद्र घारे, भरत भोते, भरत गराडे, अविनाश गराडे, सेवक घारे, धनंजय घारे, मिलिंद घारे, दिलीप देशमुख, कृष्णा गायकवाड, सागर गराडे, बाळू हिंगे अंकुश गराडे अमोल हिंगे विक्रम घारे आदी उपस्थित होते.
अशोकराव घारे, पंढरीनाथ ढोरे, गणेश विनोदे, वैशाली ढोरे, पुष्पा घोजगे, पांडुरंग गराडे यांनी शुभेच्छा दिल्या तर राजेंद्र ढमाले यांनी सूत्रसंचालन केले. आगामी कार्यकाळात ग्रामपंचायत हद्दीतील बेबडओहोळ व पिंपळखुटे येथील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहून संधीचे सोने करण्याचा विश्वास नवनिर्वाचित उपसरपंच कमल गराडे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!