टाकवे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या  संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे  शांताराम साबळे यांचा दणदणीत विजय
टाकवे बुद्रुक:
टाकवे विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल अध्यक्ष शांताराम वामन साबळे यांची बहुमताने निवड झाली.
सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग मोढवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणुक कार्यक्रम पार पडली  सदर निवडणुकीत एकुण चार अर्ज दाखल झाले होते. यामध्ये ओबीसी सेलचे अध्यक्ष शांताराम साबळे यांना ५ मते, खादी ग्राम उद्योगचे तालुका अध्यक्ष अंकुश आंबेकर यांना ३ मते, मधुकर कोकाटे व दिलीप ननवरे यांना शुन्य मते मिळाली . निवडणूक अधिकारी मदन आडिवळे यांनी शांताराम साबळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले .
सदर निवडणूकीत १२ सदस्यापैकी आठ संचालकांनी निवडणूकीत हक्क बजावला व इतर चार संचालकानी तटस्थ राहण्याची भुमिका घेतली.शांताराम साबळे यांची संचालकपदी निवड झाल्या बद्दल संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दत्तात्रेय असवले, तंटामुक्त अध्यक्ष मारूती असवले,माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे,माजी चेअरमन मारुती असवले,राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष व संचालक शिवाजी असवले,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संभाजी टेमगिरे, सरपंच भूषण  असवले ,उपसरपंच परशुराम मालपोटे,माजी सरपंच किसन ननवरे, रत्नाकर गायकवाड,परशुराम साबळे,उद्योजक अनिल मालपोटे चेअरमन पाडुरंग मोढवे,व्हा.चेअरमन जितेंद्र परदेशी, मधुकर जांभूळकर यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!