नाणे मावळातील ३२ शाळांना अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे वाटप
पुणे येथील वाचनवेड संस्था व देहूच्या अभंग प्रतिष्ठाण यांचा यासाठी पुढाकार
कामशेत:
वाचनवेड संस्था,पुणे यांच्या माध्यमातून व अभंग प्रतिष्ठाण,देहू यांच्या पुढाकारातून नाणे मावळातील जिल्हा परिषदेच्या ३२ शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली.कोळवाडी येथील सेंट थॉमस स्कूल येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत,शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज,शिवाजी थोरवे,प्रसिद्ध वृत्तनिवेदिका स्वाती गोडसे,प्रिन्स वर्गिस,अभंग प्रतिष्ठाणचे माजी अध्यक्ष सचिन काळोखे,मा.उपसरपंच सचिन कुंभार,सुरेश गाडे,विजय मोरे,अजिंक्य साकोरे,दिनेश साळुंके,प्रा.विकास कंद,प्रा.विक्रम भोईटे,केंद्रप्रमुख गुरुनाथ गायकवाड,सुहास विटे,मुकुंद तनपूरे,सुहास धस,सिताराम घोडके उपस्थित होते.
वाचनाने माणूस समृद्ध होतो.बदलत्या जीवनशैलीत वाचन व लेखन यांचा फारसा वापर केला जात नाही.प्रत्येकाने दररोज एक तास वाचन व लेखन केले पाहिजे असे मत गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी व्यक्त केले.किरीट मोरे व मयूर शेठ यांच्या वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून मावळातील २०० शाळांना मिळालेली अवांतर वाचनाची पुस्तके ही वैविध्यपुर्ण असून विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही ती जरुर वाचावीत असे आवाहन प्रा.विकास कंद यांनी केले.
पुस्तकातील एखादा प्रसंग,थोर व्यक्तींची चरित्रे वाचून जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळू शकते असे मत प्रसिद्ध वृत्तनिवेदिका स्वाती गोडसे यांनी व्यक्त केले.यावेळी समुहगीत स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल कांबरे व गोवित्री केंद्रातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश माळी यांनी तर सुत्रसंचालन अजित मोरे यांनी केले.आभार संतोष गायकवाड यांनी मानले.

error: Content is protected !!