नेसावे:
नेसावे गावातील ग्रामस्थांकडून शिक्षकदिना निमित्त शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रास्थांकडून नेसावे शाळेतील मुख्यध्यापक ञ्यंबक सक्रुभाऊ आहेर, उपशिक्षिका प्राजक्ता गिरीधर जाधव, उपशिक्षिका रूपाली सुभाष हरीहर, उपशिक्षिका अश्विनी खुषाल गोंडाने यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मल्हारी गायकवाड यांसकडून शिक्षकांना व विद्यार्थांना पेन वाटप करण्यात आले.  कार्यक्रमानिमीत्त यावेळी नेसावे गावातील पोलिस पाटील रेश्मा अंकुश शिरसट, ग्रामपंचायत उपसरपंच नंदिनी रामदास शिरसट, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा उर्मिला अनिल शिरसट, सदस्य चैताली विष्णु शिरसट, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र शिरसट, सां.वि.सोसायटीचे चेअरमन विठ्ठल शिरसट, ग्रामस्थ  गोविंद गोपाळ शिरसट, युवा नेते देवदास शिरसट, तसेच युवा नेतृत्व नवनाथ नामदेव शिरसट उपस्थित होते.
नवनाथ शिरसट म्हणाले,”
गुरू,ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थीनी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.  कार्यक्रमाचे आयाेजन नियोजन युवा नेते नवनाथ नामदेव शिरसट यांच्याकडून करण्यात आले.

error: Content is protected !!