कान्हे: अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराच्या वारसा कंपनी व्यवस्थापनाकडून आर्थिक मदत करण्यात आली. पै.विश्वनाथराव भेगडे माथाडी जनरल कामगार युनियन सुप्रीम युनिट यांच्या पाठपुराव्यातून ही मदत नुकतीच सबंधित कामगाराच्या वारसांना धनादेशाद्वारे अदा करण्यात आली.
अशोक मारूती सातकर या कामगाराचा अपघातात मृत्यू झाला होता.सातकर हे कान्हे येथील सुप्रीम कंपनीत कामाला होते. काही दिवसापूर्वी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात नंतर त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या अकस्मित निधनानंतर कंपनीने ३लाख ४२ हजार ७०८ रुपये रक्कमेचा धनादेश सुप्रीम कंपनीचे प्लांट हेड श्री शिवानंद बालगी, एच आर असिस्टंट श्री सूर्यकांत महामुनी, युनियन अध्यक्ष संतोष सातकर यांच्या उपस्थितीत सातकर यांचे वारस अश्विनी अशोक सातकर, किशोर अशोकराव सातकर यांच्या कडे सुपूर्द केला.
यावेळी युनियन सदस्य प्रकाश बालघरे, गणेश चवरे, हिम्मतराव कदम,  उपस्थित होते. या मदती बद्दल किशोर सातकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!