आयएनएस विक्रांतच्या निर्मितीत शिवे गावच्या तरुणाचे योगदान
राजगुरुनगर:
भारतीय नौदलाला भूषणावह ठरेल अशा आयएनएस विक्रांत मोठ्या दिमाखात नौदलात  दाखल झाले. २३ विमानं या युद्धनौकेवरून झेपावू शकतात,असे या युद्धनौकेत वैशिष्ट्य आहे.
शत्रूच्या काळजात धडकी भरेल अशी ही संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानी देशभक्त तरुणाचा स्वाभिमान जाग्रत करणारी आहे. ही युद्धनौका बनविण्यात शिवेगावच्या तरूणाचे योगदान आहे.
या युद्धनौकेसाठी शिवे गावचे सुपुत्र, तरूण उद्योजक, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळ व कै रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाचे संचालक , दिपक शंकर गडदे याच्या कंपनीमधून महत्वाचे काही ड्रिलींगचे काम झाले आहे .
आमच्या साठी  ही अत्यंत अभिमान व गौरवास्पद कामगिरी आहे.दिपक गडदेचे  मुंबई डबेवाला असोशिएशन हार्दिक अभिनंदन करत आहोत असे गौरवोद्गार मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले असून तळेकर म्हणाले,” देशाचा  संरक्षणासाठी मावळाचे
योगदान कायम राहीले आहे. दिपक गडदे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

error: Content is protected !!