
शिक्षक दिनी कोलते गुरुजींचा सत्कार
वडगांव मावळ:
शिक्षक दिन व स्वातंत्र्याचा अमृत वर्ष यांचे औचित्याने वडगांव शहरातील जुन्या पिढीतील गुरूवर्य
केशव रामचंद्र कोलते गुरूजी (वय ९२) यांचा सत्कार सेवानिवृत्त कर्मचारी व जेष्ठ नागरिक समन्वय समितीचे वतीने करण्यांत आला. कोलते गुरूजी यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ पुष्पगुझ देवून गौरव करण्यांत आला.
यावेळी तालुका समन्वयक नितीन भांबळ व व्याख्याते विवेक यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदत् शाळेत वडगांव येथे सन१९६०-९० च्या दशकांत चार पिढीतील विद्यार्थि घडविले.यातील अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणीक, व वेगवेगळय़ा क्षेञात कार्यक्षम आहेत.त्यांचा कार्याचा गौरव केला व शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश कुडे,शांताराम कुडे,भाऊसाहेब वहिले,बाळकृष्ण ढोरे,बाळासाहेब झरेकर, बारकू ढोरे व जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



